spot_img
spot_img
spot_img

भोसरी एमआयडीसी परिसरात १.३५२ किलो गांज्यासह युवक अटकेत

प्रतिनिधी | युनूस खतीब

भोसरी एमआयडीसी परिसरात पोलिसांनी कारवाई करत १.३५२ किलो गांज्यासह एका युवकाला अटक केली आहे.

ही कारवाई ८ मार्च रोजी दुपारी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा शोरूमजवळ भोसरी ते निगडी रोडच्या कडेला बालाजी नगर, एमआयडीसी भोसरी येथे संशयावरून तपासणी करण्यात आली. यावेळी विशाल दिलीप साळवे (वय १९, रा. बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) याच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हा (एमएच १४ एमएन ७७८७) या दुचाकीच्या डिकीत ६७ हजार ६०० रुपये किमतीचा सुमारे १.३५२ किलो वजनाचा गांजा आढळून आला.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!