शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीमध्ये क्रीडा प्रकोष्ठ शहराध्यक्षपदी राष्ट्रीय खेळाडू अरुण सुभाष पाडुळे यांची निवड करण्यात आली. ही निवड पिं,चिं भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
अरुण पाडुळे हे स्वतः राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक असून क्रीडा क्षेत्रातील त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी शहरातील अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देत राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्राला नक्कीच नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
खेळाडूंना आवश्यक असणारी मैदाने, प्रशिक्षक तसेच महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या विविध क्रीडा सुविधा याबाबत अरुण पाडुळे यांना सखोल माहिती आहे. शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व संधी मिळून ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.
“अरुण पाडुळे यांना दिलेली क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्ष पदाची जबाबदारी ते नक्कीच उत्तम प्रकारे पार पाडतील. शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्तरापर्यंत कसे नेता येईल यासाठी अरुण सर निश्चितच प्रयत्न करतील. कारण ते स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत. त्यांनी शहरातील अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. त्यांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”
“महेशदादा लांडगे “
आमदार भोसरी विधानसभा
पिं,चिं शहर.
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अरुण पाडुळे यांनी सांगितले.



