spot_img
spot_img
spot_img

मागणी आणि पुरवठा यात सुवर्णमध्य साधणारा अवलिया म्हणजेच रमेश बेंडे – विजय गुप्ता

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाचे विभागीय पुरवठा उपायुक्त रमेश बेंडे हे नुकतेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात सहकारी अधिकारी, रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

या कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे ‘सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता, पुण्याचे एफडीओ प्रशांत खताळ साहेब व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, संघटनेचे लाजपत मित्तल, चिंतामणी सोनकर, भाजप नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेचे संपर्कप्रमुख नितीन पेंटर, शंकर आतकरे, शहाजी लोखंडे यांच्यासह ऑल महाराष्ट्र व पिंपरी-चिंचवडमधील अनेक रेशन दुकानदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय गुप्ता यांनी रमेश बेंडे यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “रमेश बेंडे हे अत्यंत शांत आणि विनम्र स्वभावाचे अधिकारी होते. त्यांनी तब्बल ३१ वर्षे शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम केले. हे करत असताना त्यांच्या कामाबद्दल एकाचीही एकही तक्रार आली नाही. ही त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेची साक्ष आहे. पुरवठा विभागाला अनेकदा राजकीय नेते आणि समाजसुधारकांच्या दबावाच्या राजकारणाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठा यामध्ये योग्य तो सुवर्णमध्य साधत परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य बेंडे यांनी दाखवून दिले.”

विभागीय पुरवठा आयुक्त दिनेश तावरे यांनीही आपल्या मनोगतात बेंडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “रमेश बेंडे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि संयम यांचा आदर्श ठेवला. पुरवठा विभागातील गुंतागुंतीच्या कामकाजात त्यांनी संतुलित भूमिका घेत अनेक आव्हाने यशस्वीपणे हाताळली. त्यांच्या अनुभवाचा विभागाला मोठा लाभ झाला.”

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही बेंडे यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि संयमी कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!