शबनम न्यूज | प्रतिनिधी
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त करत यंदाच्या महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात एमआयडीसीसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ७ ते ८ हजार उद्योग कार्यरत असून एमआयडीसी सुमारे ३००० एकरांवर विस्तारले आहे. जवळपास ५ हजार कंपन्या प्लॉटधारक असतानाही मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे भोर यांनी नमूद केले.
प्रलंबित प्रमुख प्रश्न:
चौकांचे विस्तारीकरण व खराब रस्त्यांची दुरुस्ती
अपूर्ण ड्रेनेज व्यवस्था व फुटपाथ; पावसाळ्यात पाणी शिरून उद्योगांचे नुकसान
महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता
जीर्ण विजेचे खांब व अपुरी प्रकाश व्यवस्था
सीसी कॅमेरे व सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
कचरा व्यवस्थापन व आरोग्यविषयक समस्या
पर्यावरण संस्कार उद्यानाची दुरवस्था व हरितपट्टा कमी होणे
कोट्यवधी रुपयांचा कर भरूनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने उद्योग क्षेत्रात तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य मागण्या:
एमआयडीसीसाठी स्वतंत्र व वाढीव निधीची तरतूद
पायाभूत सुविधांवर तातडीने कार्यवाही
अन्यथा उद्योगांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही अभय भोर यांनी दिला आहे.


