spot_img
spot_img
spot_img

डक गार्डनमध्ये तरुणांवर हल्ला; मातीच्या पनत्यांनी मारहाण, तीन आरोपी अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: युनूस खतीब

भोसरी एमआयडीसी परिसरातील सेक्टर १२ येथील डक गार्डनमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अभिजीत तुकाराम तळपे (वय २३, रा. सज्जनगड ए/३/३०४, सेक्टर १२, एमआयडीसी भोसरी) हे त्यांचा मित्र सिध्देश प्रकाश ढोरे (वय २१) यांच्यासोबत डक गार्डनमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी प्रेम नवनाथ जाधव, स्वप्नील विलास खुने, अशिष बापु सरोदे व प्रणव योगेश ओव्हाळरा यांनी “आमच्याकडे बघून का हसता?” असा जाब विचारत वाद घातला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपींनी जमिनीवर पडलेल्या मातीच्या पनत्या उचलून फिर्यादी अभिजीत तळपे व त्यांचा मित्र सिध्देश ढोरे यांना मारहाण करून जखमी केले. जखमींवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) तसेच भादंवि कलम ३२४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ ते ३ यांना अटक करण्यात आली असून आरोपी क्रमांक ४ चा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीवर पोलिसांची कडक नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!