spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका सर्वसाधारण सभेत शहराच्या विकास प्रश्नांवर शेखर चिंचवडे यांची ठाम भूमिका

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पहिल्याच दिवशी नगरसेवक शेखर बबनराव चिंचवडे यांनी शहराच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

सभागृहात बोलताना त्यांनी शहरातील तसेच आपल्या प्रभागातील पाणीटंचाईचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर मुद्दे मांडले. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मूलभूत सुविधांचे नियोजनबद्ध नियोजन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सर्वसाधारण सभा हे लोकशाहीतील सर्वोच्च व्यासपीठ असून येथे घेतले जाणारे निर्णय थेट नागरिकांच्या हिताशी निगडित असतात, असे सांगत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

“पिंपरी चिंचवडचा विकास अधिक गतीमान व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचा विश्वास, अपेक्षा आणि सहभाग हेच आमचे खरे बळ आहे. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” असेही शेखर चिंचवडे यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विकासाबाबत सकारात्मक आणि ठोस भूमिका मांडल्याने सभागृहात त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!