spot_img
spot_img
spot_img

रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण

शिवजयंतीपूर्वी नगरसेवक सागर कोकणे यांचा पुढाकार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सागर कोकणे यांनी रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन ते यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अश्वारूढ शिवरायांच्या पुतळा परिसरात रंगरंगोटी, स्वच्छता आणि देखभालीची कामे प्रशासनाच्या मदतीने पूर्ण करण्यात आली.

शिवजयंती उत्सव भक्तिभाव आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी सागर कोकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पुतळा परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी तसेच सुशोभीकरणाची कामे जलद गतीने पूर्ण झाली.

शिवरायांच्या पवित्र स्मारकाच्या परिसरात स्वच्छता आणि सौंदर्य टिकवून ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, सागर कोकणे यांनी महापालिका प्रशासनाचे विशेष आभार मानले.

“शिवजयंतीचा सोहळा अधिक गौरवशाली, प्रेरणादायी आणि भक्तिभावाने साजरा व्हावा, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे रहाटणी परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांनीही या कामाचे स्वागत केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!