शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे येथील साऊज्योती फाउंडेशन यांच्या वतीने लता अण्णा नवले (शीतल भानुदास औटी) यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान सुभेदार महेंद्र गवई, डॉक्टर शंकर अदानी तसेच अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
लता नवले या सध्या श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, आकुर्डी, पुणे – ३५ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्यांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची निष्ठा, समर्पण आणि विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धती याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामुळे शिक्षकांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा सन्मान होत असून, त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
लता अण्णा नवले यांच्या या सन्मानामुळे शाळा, विद्यार्थी, पालक तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


