spot_img
spot_img
spot_img

शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध – महापौर रवि लांडगे

वैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा; सेवा गुणवत्तेत अधिक सुसुत्रता आणण्यावर भर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

महापौर रवि लांडगे यांनी आज महापौर कार्यालयात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व वैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला,त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्यासह वैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील वाढत्या आरोग्य गरजा, रुग्णालयीन सुविधा, उपचारांची उपलब्धता, तसेच विविध आरोग्य उपक्रमांची अंमलबजावणी आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी सर्वसामान्य नागरिकांना तत्पर, प्रभावी व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी विभागांमधील समन्वय वाढवण्यावर विशेष भर दिला. महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेला अधिक सक्षम करत नागरिकांना गुणवत्तापूर्ण उपचार देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे देखील ते म्हणाले.

बैठकीत विभागीय स्तरावरील अडचणी, पायाभूत सुविधा बळकटीकरण, मनुष्यबळ, रुग्णसंख्या वाढ, तसेच आगामी आरोग्य उपक्रमांची दिशा यावरही चर्चा झाली. महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित विषयांच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!