spot_img
spot_img
spot_img

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’ बळ; शिलाई मशीन व किटचे भव्य वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 महिला सक्षमीकरण हा केवळ शब्द नसून तो कृतीचा विषय आहे. जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगतीपथावर जातो. प्रभाग क्रमांक १० मधील भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी पहाट घेऊन येईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गणपत गोरखे यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक १० मध्ये आमदार अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नांतून आयोजित ‘मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व किट वाटप’ सोहळा काल दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाद्वारे परिसरातील ४०० गरजू महिलांना प्रशिक्षणांनंतर प्रत्यक्ष शिलाई मशीन किटचे वाटप करण्यात आले.

अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून अजितदानांना श्रद्धांजली अर्पण केली.

माता रमाईंच्या जयंतीचे औचित्य

त्याग आणि समर्पणाची मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ४०० महिलांना स्वावलंबनाचे साधन मिळणे, हीच माता रमाईंच्या विचारांना खरी मानवंदना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं

तुम्ही जिद्दीने आणि मेहनतीने चांगले काम करण्यासाठी पुढे या, तुमच्या हाताला काम मिळवून देण्याची आणि तुम्हाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. केवळ साहित्य वाटप करून आमचे कर्तव्य संपत नाही, तर या माध्यमातून माता-भगिनींच्या कौशल्याला वाव मिळून त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. यापुढेही महिलांच्या रोजगारासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध शासकीय योजना आणि वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आमदार अमित गोरखे यांनी दिले आहे.

प्रमुख उपस्थिती

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माननीय नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे आणि माजी नगरसेविका जयश्रीताई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांपैकी काही भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमदार अमित गोरखे यांच्यामुळे आम्हाला केवळ कौशल्य मिळाले नाही, तर सन्मानाने जगण्याचे साधन मिळाले आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना व्यासपीठावर किट वाटप करण्यात आले.

आमदार अमित गोरखे यांच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत असून, यामुळे ४०० कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!