spot_img
spot_img
spot_img

स्त्रीशक्तीचा अभिमान : तनु भानमुळे पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण पिंपरी- चिंचवड आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल- शत्रुघ्न काटे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीत Cariappa Parade Ground येथे पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने देशपातळीवर आपला ठसा उमटवला. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंग (सीनियर विंग) मधून देशातील सर्वोच्च ‘बेस्ट कॅडेट’ हा मानाचा किताब पटकावला.

एका दिमाखदार सोहळ्यात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची ‘केन’ देऊन गौरविण्यात आले.
शिस्त,नेतृत्व, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत तिने हा सन्मान मिळवला.

विशेष म्हणजे तनु भान ही पिंपळे सौदागर येथील रहिवासी असून, तिच्या या यशामुळे केवळ तिच्या प्रभागाचेच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे आणि महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर अधोरेखित झाले आहे.

या अभिमानास्पद यशाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तनु भान तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिचा विशेष सन्मान केला. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांनी तिच्या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले.

महिलाशक्ती, जिद्द आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरलेली तनु भान आज लाखो मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. राष्ट्रसेवेच्या क्षेत्रात मुली कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हे तिने आपल्या कर्तृत्वातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

याप्रसंगी श्री शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की,
“तनु भान ही पिंपळे सौदागरची कन्या असल्याने तिने केवळ आपल्या पिंपळे सौदागरचाच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा आणि महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली आहे. तनु भान हिचे यश हे केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, हे महाराष्ट्राच्या मुलींच्या क्षमतेचे आणि देशातील महिलाशक्तीचे तेजस्वी उदाहरण आहे. शिस्त, परिश्रम आणि देशभक्तीच्या बळावर मुली कोणतेही शिखर सर करू शकतात, याचा अभिमानास्पद संदेश तनुने देशाला दिला आहे. तिची ही वाटचाल हजारो तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल तसेच मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे तनुने आपल्या कर्तृत्वातून संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. तिची ही यशोगाथा पिंपळे सौदागर व पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.”

याप्रसंगी श्री विनोद पाटील, तनु भान यांचे कुटुंबातील सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!