spot_img
spot_img
spot_img

काळेवाडी फाटा येथे मटका जुगारावर धाड; ९ जण अटकेत, एक फरार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत काळेवाडी फाटा ब्रिजखाली मटका जुगारावर कारवाई करत पोलिसांनी २६,११४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत मोहन गुडीयाल, शंकर निकाळजे, बाळु राठोड, नितीन कसबे, पुंडलिक मंजुळे, बसाआप्पा राठोड, गोविंद भोसले, किसन सगट व नारायण ठुस्सेकर अशा ९ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींकडे “कल्याण” नावाचा मटका जुगार घेत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान मुख्य सूत्रधार सचिन टाके (रा. काळेवाडी, पुणे) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाई गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई सुमित दत्तात्रय देवकर यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास सपोनि यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!