spot_img
spot_img
spot_img

दादा घाट स्मशानभुमी ते शहिद अशोक कामटे उद्यान समोरील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य- रविराज काळे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे निलख परिसरातील दादा घाट (स्मशानभूमी) ते शहिद अशोक कामटे उद्यानासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केला आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर धूळ साचली असून, रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने जात असताना धुळीचे कण हवेत मिसळत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता वाढली असून, परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या संदर्भात वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही रविराज काळे यांनी केला आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील धुळीचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सहाय्यक आयुक्त ड. क्षत्रिय यांच्या कार्यालयाला दिलेल्या निवेदनात रविराज काळे यांनी, १५ दिवसांच्या आत हा प्रश्न सोडवण्यात यावा, अन्यथा १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीपती टकुले चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!