spot_img
spot_img
spot_img

निराधार अंध मुलींच्या लग्नास वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने निस्वार्थी आर्थिक मदत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अंध अनाथ मुला_ मुलींचे संपूर्ण संगोपन करून शिक्षण देऊन त्यांना पुढील आयुष्य सुद्धा योग्य रीतीने पार पाडता यावे यासाठी किवळे येथे माई बालभवन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेच्या वतीने अंध अनाथ मुला-मुलींचे खूप योग्यरीत्या संगोपन केले जाते, शिक्षण दिले जाते, काहींचे लग्न करून दिले जाते, काहींना नोकरी व्यवस्था केली जाते, म्हणजेच भविष्यकाळात सुद्धा त्यांचे आयुष्य चांगले राहावे भविष्यातही त्यांना कुठल्या अडचणी येऊ नये असे काम ही संस्था करते.

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने या संस्थेस वेळोवेळी शक्य ती निःस्वार्थी मदत केली जाते. माई बाल भवन या संस्थेच्या वतीने नुकताच दोन मुलींचा किवळे येथे विवाह सोहळा आयोजित केला होता या विवाह सोहळ्यात अनेक खर्च होते! त्यामुळे माई बाल भवन संस्थेने वुई टुगेदर फाउंडेशनला मदतीचे आवाहन केले होते या आव्हानास प्रतिसाद देत वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी फाउंडेशनच्या सदस्यांना मदतीचे आवाहन केले.

अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्यासह सदस्यांनी एकत्र येऊन 21,111रुपये या मुलींना रोख रक्कम आहेर दिला व या नवदांपत्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या या मदतीमुळे या मुलींच्या लग्नाला मोठा हातभार लागला त्यामुळे माई बाल भवन संस्थेचे पदाधिकारी व उपस्थित वऱ्हाडी मंडळींना खूप समाधान वाटले
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे- सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे नंदकुमार वाडेकर, अनिल शिंदे, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, राजेंद्र महाले,सरिता कुलकर्णी, विलास कडेकर, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद ,सीता केंद्रे, सदाशिव गुरव ,दिलीप पेटकर ,के रंगराव, धनराज गवळी ,रमाकांत उजळंबकर, उदय कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, श्रीरंग दाते, अर्जुन पाटोळे, एम के शेख, अपर्णा अष्टीकर, जावेद शेख, अनिल पोरे, झाकीर सय्यद ,हनीफ सय्यद राजेंद्र ताठे, रवी इंगळे ,दत्तात्रय शेटे,आदींनी या लग्न समारंभास आर्थिक मदत करण्याचा पुढाकार घेतला.
माई बाल भवन संस्थेचे संचालक मधुकर इंगळे यांनी वुई टुगेदर फाउंडेशनचे व सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानले

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!