शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत एकूण 64 नवे नगरसेवक प्रथमच महापालिका सभागृहात प्रवेश करणार असून, त्यामुळे शहराच्या कारभारात नव्या विचारांना, नव्या ऊर्जेला आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे.
हे सर्व नवे नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेस या तीन प्रमुख पक्षांचे असून, मतदारांनी यंदा अनुभवी चेहऱ्यांपेक्षा नव्या, तरुण आणि सक्रिय नेतृत्वावर अधिक विश्वास दाखवला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. बदलत्या अपेक्षा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उमेदवारांना मिळालेला हा कौल, आगामी पंचवार्षिक कार्यकाळात महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
एकूणच, 2026 ची निवडणूक ही केवळ सत्तांतर किंवा संख्याबळापुरती मर्यादित न राहता, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची ठोस नोंद ठरली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 2026 च्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शहरावर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भाजपने तब्बल 85 जागांवर विजय मिळवत महापालिकेतील सत्ता अधिक मजबूत केली आहे. तर भाजपविरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 36 जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेचे ६ उमेदवार निवडून आले आहे.
प्रभागनिहाय नवे चेहरे
नवीन नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादीचे विकास साने, यश साने आणि भाजपच्या सोनम मोरे यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या सारिका बो-हाडे, सुजाता बोराटे व निखिल बो-हाडे यांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या सारिका गायकवाड, अर्चना सस्ते आणि सचिन तापकीर निवडून आले. प्रभाग क्रमांक 4 मधून श्रुती डोळस, कृष्णा सुरकुले व उदय गायकवाड यांनी सभागृहात प्रवेश केला.
प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या कविता भोंगाळे, तर प्रभाग क्रमांक 6 मधून रेखा देवकर व राजश्री लांडगे व योगेश लांडगे विजयी ठरल्या. प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादीचे विराज लांडे आणि भाजपच्या राणी पठारे निवडून आल्या.
प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे डॉ. सुहास कांबळे, तर राष्ट्रवादीच्या अश्विनी वाबळे व तुषार सहाने यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधून सिद्धार्थ बनसोडे आणि राष्ट्रवादीच्या सारिका मासुळकर, तर प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या भाजप चे कुशाग्र कदम,
प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपच्या रिटा सानप व निलेश नेवाळे, तर प्रभाग क्रमांक 12 मधून शीतल वर्णेकर व शिवानी नरळे यांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे अनिल घोलप व अर्चना करांडे, प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे कैलास कुटे व राष्ट्रवादीच्या अरुणा लंगोटे निवडून आल्या.
प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे धर्मपाल तंतरपाळी, शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे व शहराध्यक्ष निलेश तरस हे नवे चेहरे आहेत.
प्रभाग क्रमांक 17 मधून पल्लवी वाल्हेकर व राष्ट्रवादीचे शेखर चिंचवडे, प्रभाग क्रमांक 18 मधून मनीषा चिंचवडे, तर प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपच्या मधुरा शिंदे व मंदार देशपांडे आणि राष्ट्रवादीच्या सविता आस्वानी यांनी यश संपादन केले.
प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादीच्या मनीषा लांडे व वर्षा जगताप, प्रभाग क्रमांक 21 (पिंपरी) मधून प्रियंका कुदळे, प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपच्या कोमल काळे, तर प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादीच्या योगिता बारणे निवडून आल्या.
प्रभाग क्रमांक 24 मधून भाजप पुरस्कृत अपक्ष शालिनी गुजर, प्रभाग क्रमांक 25 मधून कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ व श्रुती वाकडकर, तर प्रभाग क्रमांक 26 मधून भाजपच्या स्नेहा कलाटे यांनी सभागृहात प्रवेश केला.
प्रभाग क्रमांक 27 मधून भाजपच्या अर्चना तापकीर व राष्ट्रवादीचे सागर कोकणे, प्रभाग क्रमांक 28 मधून अनिता काटे व कुंदा भिसे निवडून आल्या.
प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपच्या रवीना आंगोळकर व शाम जगताप, प्रभाग क्रमांक 30 मधून राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा जवळकर, प्रभाग क्रमांक 31 मधून राष्ट्रवादीच्या दीप्ती कांबळे व भाजपच्या ज्ञानेश्वर जगताप आणि पल्लवी जगताप विजयी ठरल्या.
प्रभाग क्रमांक 32 मधून भाजपच्या तृप्ती कांबळे आणि राष्ट्रवादीच्या उज्वला ढोरे या नव्या नगरसेवक म्हणून सभागृहात दिसणार आहेत.
तरुणांना संधी, नव्या नेतृत्वाची सुरुवात
एकूणच, 2026 ची पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक ही भाजपच्या सत्तेची पुनःपुष्टी करणारी ठरली, तसेच मतदारांनी नव्या व तरुण चेहऱ्यांवर विश्वास टाकत शहराच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची पायाभरणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.


