spot_img
spot_img
spot_img

अप्पू घर येथे 24 ते 26 जानेवारी दरम्यान स्वराज्य की लढाई माहितीपट मोफत दाखविण्यात येणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

निगडी येथील अप्पू घर मनोरंजन केंद्र येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, स्वराज्याची स्थापना आणि त्यांच्या प्रमुख किल्ल्यावरील ऐतिहासिक माहीती सुमारे 30 मिनिटाची माहिती पट अप्पू घर येथील मिनी थिएटर मध्ये येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून मोफत दाखविण्यात येणार असल्याचे अप्पू घरचे मुख्य संचालक डॉ राजेश मेहता यांनी सांगितले . मात्र अप्पू घरचे प्रवेश शुल्क प्रत्येकाला द्यावे लागेल असे त्यांनी सांगितले. डॉ . मेहता पुढे म्हणाले, प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून तो आपल्या संविधान, इतिहास आणि स्वराज्याच्या मूल्याची आठवण करून देणारा दिवस आहे . मनोरंजनासोबत शिक्षण देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पिंपरी चिंचवड, पुणे , ग्रामीण तसेच महाराष्ट्र भरातील नागरिकांसाठी अविरत गेले 35 वर्षाहून अधिक नागरिक पर्यटकांचे विश्वासार्ह अप्पू घर ची मनोरंजन केंद्र म्हणून ख्याती आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे देशभक्ती, इतिहास आणि येणाऱ्या कुटुंबीयांच्या मनोरंजन यांच्या संगम ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले .
अप्पू घर येथील मिनी थिएटर मधील सध्या प्रति व्यक्ती 60 रुपये दर आकारून सदर माहितीपट दाखविण्यात येतो. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येणाऱ्या 24 ते 26 जानेवारी दरम्यान कोणत्याही वयोगटातील नागरिकाकडून तीस मिनिटांचे माहितीपट दाखविण्यासाठी दर आकारले जाणार नाही. माहितीपट पूर्णतः मोफत असणार आहे. तसेच येणाऱ्यासाठी तात्पुरते टॅटू पेंटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलासह कुटुंबीयांसाठी हा विशेष आकर्षणाचा भाग असणार आहे. असे येथील व्यवस्थापक धम्मपाल वाघमारे यांनी सांगितले आहे .
अधिक माहितीसाठी व्यवस्थापक धम्मपाल वाघमारे 992397745 यांच्याशी संपर्क साधावा असे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहें .

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!