शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रचाराला वेग येत असताना परिसरातील नागरिकांकडून जागोजागी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत असून फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात प्रचार रॅली पार पडत आहे. प्रियांका ताई बारसे यांना प्रत्यक्ष पाहून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून अनेक नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधत आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या.

घराघरात जाऊन जनसंपर्क साधताना रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व बालकल्याण तसेच युवकांसाठी संधी निर्माण करण्यासारख्या मुद्द्यांवर प्रियांका ताई बारसे यांनी भर दिला आहे. विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “विकास, विश्वास आणि कार्यक्षम नेतृत्व” या मुद्द्यांवर आधारित त्यांचा प्रचार प्रभावी ठरत असून मतदारांचा वाढता प्रतिसाद त्यांच्या विजयाची आशा बळकट करत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असून निवडणूक प्रचाराच्या पुढील टप्प्यातही त्यांचा जनसंपर्क अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



