spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागर-रहाटणीचा यंदा कायापालट होणार..

भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटेंचा नववर्षी निर्धार..

नागरिकांवर केला नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव…

पिंपरी सौदागर (दि. १ जानेवारी २०२६) :- पिंपळे सौदागर–रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये यंदाच्या निवडणुकीत विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वास भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केला. नववर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प स्पष्टपणे मांडला.

 

अनिताताईंनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासकामांना गती देण्याचे नियोजन तयार केले आहे. “विकास हा निवडक लोकांसाठी नसून संपूर्ण प्रभागासाठी असायला हवा,” असेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर बोलताना त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, पथदिवे, वाहतूक व्यवस्थापन, ड्रेनेज, उद्याने आणि आधुनिक व्यायामशाळा आणखी प्रगत करण्याचा मनोदय व्यक्त केला. महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आणि तरुणांसाठी क्रीडा व करिअर मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा त्यांनी यावेळी शब्द दिला.

नवीन वर्ष २०२६ हे नव्या आशा, नवे यश आणि आनंद घेऊन येवो, अशी प्रार्थना करत अनिताताईंनी नागरिकांशी संवाद साधला. भेटीगाठीदरम्यान अनेक मतदारांनी “यंदा बदल हवा — नवा” असा उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली.

“फक्त घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम — हेच आमचं वचन,” असे सांगत अनिताताईंनी पुढील काळात नागरिकांच्या सूचनांवर आधारित विकासकामे प्रभागात राबविणार असल्याचे सांगितले.
नववर्षाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने अनिताताईंनी भाजपमय प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.a

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!