शबनम न्यूज | प्रतिनिधी
भाजपचे पिंपरी चिंचवड शहर सचिव नवनाथ मारुती ढवळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्याला चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, राम रामायणाचार्य महावीर महाराज सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या समवेत आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर व किशोर चित्राव, अजय ओव्हाळ, सुरेश रानवडे, सुनिल ढवळे, किशोर चित्राव, पंडीता, अशोक कटारे, राजू काटे, प्रधान काटे, संत काका, ज्ञानदेव काटे, दत्तात्रय ढवळे पाटील, बाळासाहेब बोडके, रामदास काटे , जालिंदर काटे, आशोक काटे, बाळासाहेब काटे, संतोष काटे, भरत काटे, रोहिदास बोरगे, शेखर गोरगले, पुनावळे ग्रामस्थ व महिला भगिनी, तरूण कार्यकर्ते, उपस्थित होते.

नवनाथ ढवळे यांच्या जनसंपर्काच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहे. शासनाच्या विविध योजना या जनसंपर्काच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. तसेच प्रभागातील नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविले जाते, प्रभागातील जेष्ठ नागरिक, महिला-भगिनींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
याप्रसंगी बोलताना नवनाथ ढवळे म्हणाले, “जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्यासाठी हे कार्यालय स्थापन करण्याचा मूळ उद्देश, विकासासाठी अहोरात्र सेवेत ही संकल्पना मनात बाळगून आपण हे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.”


