spot_img
spot_img
spot_img
spot_img

मिरवणूक पाहून परतणाऱ्या युवकावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला; धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मिरवणूक पाहून घरी परतणाऱ्या तरुणावर धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सिमेंटच्या गट्टूने हल्ला करून जखमी केल्याची घटना निगडीतील दळवीनगर कॉर्नर येथे घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दळवीनगर कॉर्नर येथे ही घटना घडली. फिर्यादी शुभम सिताराम फडके (वय २१, रा. चिंचवड स्टेशन) हे मिरवणूक पाहून घरी जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांच्याशी वाद घातला.

वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन मुख्य आरोपीने सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या कपाळावर व डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर इतर दोघांनीही हाताने मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!