spot_img
spot_img
spot_img
spot_img

भरधाव आयशरची दोन महिलांना धडक; वृद्धेचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी येथे भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना धडक दिल्याने ८२ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता ‘प्रेमाचा चहा’ हॉटेलसमोर पुण्याकडून चाकणकडे जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. आरोपी इस्माईल रमजान अली (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) हा आयशर ट्रक (एमएच ०९ डीएफ ३२३७) भरधाव व बेदरकारपणे चालवत होता.

यावेळी शांताबाई गंगाधर पांचाळ (वय ८२) आणि राजश्री अशोक पांचाळ (वय २४) या दोघी पायी रस्ता ओलांडत असताना ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शांताबाई पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजश्री पांचाळ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ट्रक चालक इस्माईल रमजान अली याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगीडवार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!