पिंपळे गुरव (प्रतिनिधी):
नवी सांगवीतील साई चौक येथील लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केटमध्ये आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना पेढे वाटून जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आपल्या ओजस्वी शाहिरीतून जनजागृती करून महाराष्ट्राच्या अस्मितेला बळ दिले. समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचे त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील प्रत्येक घटकाच्या सन्मानासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केटमध्ये दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या केल्या जातात. तसेच समाजोपयोगी आणि समाजप्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मानही करण्यात येतो.
यावेळी कुणाल धिवार, रमेश डफळ, संदीप पाटील, नितीन कुचेकर, गणेश मते, तौफिक सय्यद, प्रवीण भोसले, जगदीश बच्छाव, अंकुश आपेट, भरत प्रसात, खंडेराव हल्लाले, सयाजी आगलावे, गणेश पैठणी, नितीन दोधाड, वैभव काळे, अरुण जाधव, बपीराम भोंगे, मनोज शिंदे, नवीन खान, एजास शहा, किरण वाणी, विपुल शिंदे, अंजना शिंदे, नंदा जाधव यांच्यासह भाजी विक्रेते, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



