प्रतिनिधी | युनूस खतीब
महाळुंगे (ता. मुळशी) येथील राहत्या घरासमोर पार्क केलेली ₹४५ हजार किमतीची बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शहाजी नामदेव वाघमारे (वय ५२, व्यवसाय – व्यावसायिक, रा. अनिकेत कोळेकर यांच्या चाळीत, महादेव मंदिराजवळ, महाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१०/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते २ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० या कालावधीत फिर्यादी यांनी त्यांची काळ्या रंगाची बुलेट मोटारसायकल (क्रमांक MH 12 TZ 0698) घरासमोर लॉक करून पार्क केली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या परवानगीशिवाय मोटारसायकल चोरी करून नेली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर हे करीत आहेत.



