प्रतिनिधी | युनूस खतीब
निगडी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वेदांत अनिल कुदळे (वय २०, रा. कुदळे चाळ, भाजी मंडईजवळ, विवेकनगर, आकुर्डी, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) व ३(५) अन्वये निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस शिपाई सुमित मारुती मोरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र येथील खाते क्रमांक ६०५६४४३४१०० उघडून आपल्या साथीदारांशी संगनमत केले. या खात्यावर एकूण ₹३०,०२,७४२.१५ इतके आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या व्यवहारांद्वारे देशातील दोन नागरिकांची ₹२,२६,२४९.१५ इतक्या रकमेची सायबर फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.



