spot_img
spot_img
spot_img
spot_img

गाडी पार्किंगच्या वादातून तरुणावर विट फेकून हल्ला; एकावर गुन्हा

प्रतिनिधी | युनूस खतीब

गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका २२ वर्षीय तरुणावर विट फेकून जखमी केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पवन पुरुषोत्तम गिडवाणी (वय २२, व्यवसाय – शिक्षण, रा. एच.बी. २९/१, सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक परमानंद धणवाणी (वय अंदाजे ५५, रा. सत्यनारायण मंदिराजवळ, पिंपरी) याच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता फिर्यादीच्या घरासमोर त्यांच्या वडिलांनी अॅक्टिवा दुचाकी उभी केल्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपीने “येथे गाडी लावायची नाही” असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेली मातीची भाजलेली विट उचलून ती फिर्यादीच्या दिशेने फेकली. ही विट फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने ते जखमी झाले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२५(ड), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काजळकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!