spot_img
spot_img
spot_img
spot_img

जुन्या वादातून तरुणावर पट्ट्याने हल्ला; थेरगावातील तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

थेरगावातील पवारनगर परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून २० वर्षीय तरुणावर पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा खानावळ व स्नॅक्स सेंटरसमोर ही घटना घडली. फिर्यादी भिमाशंकर ऊर्फ नागेश महादेव जेवळे (वय २०) याला आरोपी चैतन्य कागे, दर्शन सोमवंशी आणि ईरेश लोहार यांनी अडवून जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण केली. यावेळी चैतन्य कागे याने पट्ट्याने फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करून जखमी केले, तर तिन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, “पोलीस तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!