spot_img
spot_img
spot_img
spot_img

पुनावळ्यात गांजाची विक्री करणारा तरुण जेरबंद; २३४ ग्रॅम गांजा व दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

रावेत पोलिसांनी पुनावळे गावठाण परिसरात कारवाई करत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून २३४ ग्रॅम गांजा आणि एक दुचाकी असा एकूण ₹७१,७०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिरामागील मोकळ्या जागेत सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी विकास सुबोध ढोले (वय २२, रा. पुनावळे, मूळ रा. नांदेड) याच्या ताब्यात पांढऱ्या रंगाच्या दुचाकीत विक्रीसाठी बेकायदेशीररित्या ठेवलेला २३४ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!