spot_img
spot_img
spot_img
spot_img

तळेगाव दाभाडेत भरदिवसा ॲक्टिव्हा चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकाजवळ भरदिवसा पार्क केलेली होंडा ॲक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी आचितराव राऊत (वय ४०) यांनी आपली एमएच १४ जीव्ही २७९१ क्रमांकाची सुमारे ₹२० हजार किमतीची होंडा ॲक्टिव्हा ड्रीम लंच होमच्या बाजूला रस्त्यावर पार्क केली होती. दुपारी १.३० ते सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सरजिने करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!