पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
हिंजवडी पोलिसांनी संघटित सायबर फसवणूक प्रकरणात बँक खाते वापरण्यास दिल्याच्या आरोपावरून अहमदनगर जिल्ह्यातील ओमकार विष्णू शिरसाट व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२) व ३(५) अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी करून दिला. या खात्याचा संबंध महाराष्ट्रातील कापूरबावडी पोलीस ठाणे तसेच कर्नाटकातील बासवन बागेवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एनसीसीआरपी सायबर फसवणूक तक्रारींशी असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.



