spot_img
spot_img
spot_img

तळेगावात सायबर फसवणूक रॅकेटचा भांडाफोड; सलूनच्या नावाने खाते उघडून ७ जणांची ₹६.१० लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

तळेगाव दाभाडे पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरोधात कारवाई करत किरण राजेंद्र शिंदे (वय ३६) याच्याविरुद्ध संघटित सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ‘FINAL TOUCH UNISEX SALON’ या नावाने आयडीबीआय बँकेत तसेच स्वतःच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडून सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.

तपासात आरोपीच्या खात्यांमधून ६ लाख १३ हजार ८८२ रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, देशातील ७ नागरिकांच्या सायबर फसवणुकीतील ६ लाख १० हजार १६५ रुपये या खात्यांमध्ये जमा झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!