पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
देहूरोड पोलिसांनी संघटित सायबर गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई करत १३ लाख ४० हजार १ रुपयांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार राजेंद्र मोरे (वय २१, रा. देहुगाव) याने स्वतःचे बँक ऑफ महाराष्ट्रचे खाते सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक व्यवहारासाठी उपलब्ध करून दिले. या खात्यात फसवणुकीतील ₹१३.४० लाखांची रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने साथीदारांसोबत संगनमत करून संघटित सायबर गुन्हेगारीत सहभाग घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.


