spot_img
spot_img
spot_img

“तू पोलिसांचा खबरी आहेस” म्हणत सांगवीत चौघांचा हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, मनगट फ्रॅक्चर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

जुनी सांगवीतील माहेश्वरी चौकाजवळील आहिल्याबाई होळकर घाट परिसरात एका व्यक्तीवर “तू पोलिसांना आमची खबर देतोस” असा आरोप करत चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले असून डोक्याला व पाठीवरही गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी यश बर्डे, अमित चलवादी, राहुल चव्हाण आणि अक्षय मोरे (सर्व रा. जुनी सांगवी) यांच्याविरुद्ध सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी घाटावर बसले असताना आरोपींनी त्यांचे कपडे फाडून खाली पाडले. त्यानंतर अक्षय मोरे याने लोखंडी रॉडने हल्ला केला, तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!