पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका चालकाला रावेत पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक सर्जेराव वारके (वय ३७, रा. चिंचवड) हा म्हस्के वस्ती, रेल्वे पटरीजवळ संशयास्पदरीत्या फिरत असताना त्याच्याकडून सुमारे ८०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या १४ दिवसांच्या शस्त्रबंदी आदेश काळात आरोपीकडे धारदार शस्त्र आढळल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.


