spot_img
spot_img
spot_img

स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे.

परिपत्रकानुसार, स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्यात येणार आहे. त्यानुसार मंत्रालय तसेच राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.

हा कार्यक्रम राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांमध्येही आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

स्व. अजित अनंतराव पवार यांनी सार्वजनिक जीवनात केलेल्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!