शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोणत्याही घरगुती उपकरणाचे महत्त्व केवळ खरेदीपुरते नसते. या उपकरणाचे खरे मूल्य रोजच्या वापरातून दिसून येते. वापरकर्त्याला लाभदायक, सोयीस्कर आणि आराम देणारे उपकरण असणे गरजेचे असते. या उपकरणाला दीर्घकाळ ग्राहकांच्या अपेक्षांवर खरे उतरावे लागते. घरगुती उपकरणाच्या खरेदीत सर्वसमावेशक वॉरंटी खूप महत्त्वाची असते. ही वॉरंटी ग्राहकांना भविष्यातील अनपेक्षित खर्चापासून वाचवते. शिवाय उपकरणातील सततचा बिघाड होणार नाही, ही शाश्वती मिळाल्याने ग्राहक निश्चिंत राहतात.
ग्राहक घरगुती उपकरणांची खरेदी करताना त्यातील वैशिष्टये, किंमत आणि वॉरंटी या घटकांना प्राधान्य देतात. मात्र, या गोष्टी तपासताना अनेकदा वॉरंटीच्या सविस्तर अटींकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तविक, ही उपकरणे अनेक वर्षे कार्यरत राहणे अपेक्षित असते. त्यामुळे वॉरंटी केवळ अतिरिक्त लाभ ठरत नाही. खरेदीनंतरची विश्वसनीय सेवा आणि सर्वसमावेशक वॉरंटी ही उपकरणाच्या उत्कृष्ट कामगिरीएवढीच महत्त्वाची असते. सध्या ग्राहक खरेदीचा निर्णय घेताना सर्वसमावेशक वॉरंटीला प्राधान्य देतात. परिणामी, विक्रीपश्चात मिळणारे हे संरक्षण केवळ सेवा न राहता ग्राहकांच्या विश्वासाचा मुख्य आधार बनले आहे.
तुम्ही नवे घरगुती उपकरण खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ग्राहकांच्या मदतीसाठी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस बिझनेस सर्व्हिस हेड अर्नब बागची यांनी यांनी काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत. वॉरंटीशी संबंधित या टीप्स तुम्हांला घरगुती उपकरणे खरेदी करताना नक्कीच फायदेशीर ठरतील:
घरगुती उपकरणाचा सततचा खर्च समजून घ्या
घरगुती उपकरणाची खरेदी किंमत ही केवळ तुमच्या उपकरणाच्या वापराची सुरुवात असते. याअगोदरच दुरुस्ती खर्च, सुट्या भागांची उपलब्धता, सर्व्हिस चार्जबद्दल आगाऊ विचार करावा. उपकरणाच्या दीर्घ आयुष्यात अपेक्षित एकूण खर्च, विजेची बचत, देखभालीची गरज लक्षात घ्यायला हवी. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर योग्य निर्णय घेणे उचित ठरते. स्पष्टपणे नमूद अटींमुळे वॉरंटीबद्दल अचूकपणे माहिती मिळते. परिणामी मासिक बजेट आखणे सोपे होते. ही वॉरंटी खरेदीनंतरच्या सुरुवातीच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षांमध्ये येणा-या अनपेक्षित खर्चापासून ग्राहकांना पूर्ण संरक्षण देते.
सामान्य वॉरंटी आणि सर्वसमावेशक वॉरंटीमधील फरक जाणून घ्या
सामान्य वॉरंटीमध्ये उपकरणाच्या केवळ ठराविक भागांनाच मर्यादित संरक्षण दिले जाते. यात अनेक तांत्रिक त्रुटी, अपवाद आणि छुपे खर्च समाविष्ट असतात. उदाहरणार्थ एखाद्या एसीवर एक वर्षाची संपूर्ण आणि ५ ते १० वर्षांची कॉम्प्रेसर वॉरंटी असू शकते. अशा वेळी केवळ कॉम्प्रेसरलाच दीर्घकालीन संरक्षण मिळते. परंतु पीसीबी किंवा फॅन मोटर खराब झाल्यास ग्राहकाच्या खिशाला कात्री पडते. गॅस गळती किंवा इतर समस्या उद्भवल्यास त्याचा भुर्दंडगी ग्राहकालाच भरावा लागतो. याउलट, सर्वसमावेशक वॉरंटीमध्ये सर्व प्रमुख घटकांना संरक्षण दिले जाते. परिणामी, भविष्यातील अनपेक्षित दुरुस्ती खर्चाचा आर्थिक धोका टाळता येतो.
खरेदीपूर्वी वॉरंटीच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा
वॉरंटीमधील बारीक अक्षरांमध्ये लिहिलेल्या अटींकडे लक्ष द्या. बहुतांश उपकरणांवर सामान्य वॉरंटी दिली जाते. उपकरणासंबंधित अटी व शर्ती ब्रँण्ड आणि उत्पादन श्रेणीनुसार बदलतात. वॉरंटी अंतर्गत मिळणारे संरक्षण, अपवाद, छुपे खर्च आणि वार्षिक देखभाल खर्च आवर्जून तपासा. तसेच वॉरंटी एकूण कालावधीची अचूक माहिती द्या. उदाहरणार्थ, एसीच्या वॉरंटीमध्ये गॅस रिफलिंग किंवा रिमोटचा समावेश आहे का, याची खात्री करा. काही वॉरंटीमध्ये झिजणा-या सुट्या भागांचा समावेश नसतो. काही सेवा ठराविक भौगोलिक क्षेत्रापुरत्या मर्यादित असतात. या सर्व तपशिलांची पूर्वकल्पना असल्यास योग्य निर्णय घेणे सोपे होते. परिणामी, भविष्यात उद्भवणारा अनपेक्षित खर्च पूर्णपणे टाळता येतो.
वॉरंटी हा उपकरण खरेदीतील सर्वात महत्त्वाचा घटक
उपकरणाशी संबंधित वॉरंटीच्या अटी या किंमत आणि संबंधित वैशिष्ट्यांएवढेच महत्त्वाच्या असतात. सर्वसमावेशक वॉरंटी ही उत्पादनाच्या गुणवत्तेवरील उत्पादकाचा आत्मविश्वास दर्शवते. यातून कंपनीची ग्राहकांच्या समाधानाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. गोदरेज कंपनी ग्राहकांच्या या विश्वासाचा सन्मान राखते. अनेक वर्षांच्या विश्वसनीय सेवेमुळेच ग्राहक आमच्या उपकरणांच्या खरेदीत गुंतवणूक करतात, याची आम्हांला जाणीव आहे. म्हणूनच आमची ५ वर्षांची मोफत सर्वसमावेशक वॉरंटी ही ग्राहकांना पारदर्शकता देणारे वचन ठरते. यामध्ये कोणताही छुपा खर्च समाविष्ट नसून, ग्राहकांना पूर्ण सुरक्षितता मिळते.
उपकरणाच्या खरेदीनंतर वॉरंटी नोंदणी व कागदपत्रे सांभाळून ठेवा
घरगुती उपकरणांची खरेदी केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. ग्राहकांनी स्वतःचा अचूक तपशील दिल्यानंतर वॉरंटी सक्रीय करुन घ्यावी. तसेच संबंधित कागदपत्रे आणि ब्रँण्डचा अधिकृत कस्टमर सपोर्ट नंबर नेहमी स्वतःजवळ बाळगा. या पूर्वतयारीमुळे काही समस्या उद्भवल्यास तातडीने मदत उपलब्ध होईल. वेळ वाचेल आणि नाहक त्रासातून सुटका होईल. हा अधिकृत नंबर उत्पादनावरच चिकटवलेला असतो. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरही हा नंबर उपलब्ध असेल. हा नंबर आवर्जून सेव्ह करा. इंटरनेट सर्च इंजिनवर अनधिकृत नंबर शोधणे टाळा. यामुळे अधिकृत सेवा केंद्र असल्याचे भासवणा-या फसव्या लोकांपासून तुमचे संरक्षण होईल.
अशा पद्धतीची सर्वसमावेशक खरेदी खरेदी केलेल्या उपकरणाचे संरक्षण करण्यासह ग्राहकांच्या समाधानाप्रती व गुणवत्तेप्रती ब्रँण्डची निष्ठा दर्शवते. ही सेवा केवळ खरेदीपुरती मर्यादित नसून, ग्राहकांना दीर्घकाळ उत्तम सेवा देण्याचे वचन असते. यामुळे ग्राहकांना उपकरणाबाबतच्या वापराबाबत पूर्ण मानसिक शांतता आणि विश्वास मिळतो.



