spot_img
spot_img
spot_img

पुनावळ्यात देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

रावेत पोलिसांनी पुनावळे परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात कारवाई करत एका तरुणाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सिद्धसिला ईला सोसायटीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी सिद्धार्थ किशोर कांबळे (वय २०) याच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेल्या देशी दारूच्या नऊ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या ‘पॉवर लाईम पंच’ या देशी मद्याच्या ९० मिली क्षमतेच्या नऊ बाटल्यांची किंमत सुमारे ३६० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा कोणताही परवाना नसताना आर्थिक फायद्यासाठी दारूची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी रावेत पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!