spot_img
spot_img
spot_img

तडीपार आरोपी कोयत्यासह सापडला; काळेवाडी पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब

तडीपार आदेशाचे उल्लंघन करत लोखंडी कोयता बाळगून फिरणाऱ्या सराईत आरोपीला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरासमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. विजय राहुल तलवारे (वय २३, रा. मोरया कॉलनी, माऊली चौक, काळेवाडी) हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

तपासणीदरम्यान आरोपीकडे लोखंडी कोयता आढळून आला. चौकशीत तो तडीपार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर तसेच पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले असतानाही तो शहरात वावरत असल्याचे समोर आले.

याशिवाय सध्या लागू असलेल्या मनाई आदेशानुसार शस्त्रे किंवा घातक वस्तू बाळगण्यास बंदी असतानाही आरोपीने कोयता जवळ बाळगून आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!