spot_img
spot_img
spot_img

रावेतमध्ये देशी पिस्तूलसह तरुण जेरबंद; पोलिसांची मध्यरात्री कारवाई

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब

रावेत परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला रावेत पोलिसांनी मध्यरात्रीच्या कारवाईत अटक केली. शहरात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी पहाटे १२.४० वाजण्याच्या सुमारास सिटी वन सोसायटीसमोरील ४० फूट रस्ता, राजयोग कॉलनी रोड, रावेत येथील कचरा डेपोच्या संरक्षण भिंतीलगत आरोपी नितीन पांडुरंग घवाळे (वय ३१, रा. रमाबाईनगर, रावेत) संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने २४ जून ते ७ जुलै या कालावधीत शहरात शस्त्रे व घातक वस्तू बाळगण्यास मनाई करणारे आदेश लागू केलेले असतानाही आरोपीने त्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!