spot_img
spot_img
spot_img

इन्स्टाग्रामवरील ‘लग्नाचे आमिष’ ठरले महाग; गृहिणीची ५.०३ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

नवी सांगवी येथील एका ३० वर्षीय गृहिणीला इन्स्टाग्रामवरून लग्नाचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख ३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर “लग्नासाठी मुलगी पाहिजे” अशी पोस्ट पाहून संबंधित महिलेने संपर्क साधला होता. त्यानंतर आरोपीने स्वतःला यूकेमध्ये असल्याचे सांगत तिच्याशी चॅटिंग सुरू केली. विश्वास संपादन करण्यासाठी महागडे दागिने, डायमंड, कपडे, फुटवेअर आणि आयफोन खरेदी करून कुरिअरने पाठवल्याचे भासविण्यात आले.

यानंतर स्वतःला DHL कुरिअर कंपनीचा कर्मचारी सांगणाऱ्या दुसऱ्या आरोपीने पार्सल भारतात आल्याचे सांगत कस्टम ड्युटीच्या नावाखाली ५.०३ लाख रुपये भरायला लावले. पैसे भरल्यानंतरही आरोपींनी पार्सलच्या विम्यासाठी आणखी ५.८० लाख रुपयांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीसांचे आवाहन : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या लग्न, भेटवस्तू किंवा परदेशातून पार्सल पाठविण्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!