spot_img
spot_img
spot_img

खंडणीसाठी अपहरण, मारहाण; केटरिंग व्यावसायिकाकडून ५५ हजारांची वसुली, चौघे अटकेत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

दोन मुलींची छेड काढल्याचा खोटा आरोप करून एका केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करत त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार चाकण परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर यादव (वय ३६) यांना आरोपींनी फोन करून दोन मुलींची छेड काढल्याचा आरोप करत प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिली तसेच हॉटेलचे बिल जबरदस्तीने भरायला लावले.

यानंतर आरोपींनी यादव यांचे रिक्षामधून अपहरण करून बेल्ट व हाताने मारहाण केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवत दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. फिर्यादीकडे पैसे नसल्याने त्यांना केटरिंगच्या ग्राहकांकडे नेऊन पैसे उभे करण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी रोख ४५ हजार रुपये व ऑनलाइन १० हजार ९५० रुपये अशी एकूण ५५ हजार ९५० रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

इतकेच नव्हे तर फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही जबरदस्तीने घेऊन आणखी पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी अपहरण, खंडणी, धमकी व मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल करून सनी उघडे, अनिकेत ढोले, रवी परघरमोल आणि प्रेम अंकुश यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!