पिंपरी, दि. २८ जून : उम्मत फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ तसेच विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष “करिअर गाईडन्स प्रोग्राम” आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम रविवारी, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आचार्य अत्रे हॉल, वायसीएम हॉस्पिटलजवळ, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे होणार आहे.
या कार्यक्रमात अनीस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक श्री. अनीस कुट्टी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, ते विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, संरक्षण क्षेत्रातील करिअर आणि यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत.
उम्मत फाउंडेशनचे अध्यक्ष झीशान भाई सय्यद आणि सरचिटणीस मुनाफ भाई तरासागर यांनी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमातील उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


