पिंपरी, प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणविषयक कार्याला उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, कबीर मोहम्मद, माजी सरचिटणीस जितेंद्र छाबडा, हरीश डोळस, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, रिजवान खान, उमेश बनसोडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक समता, शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



