पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांसाठी नगरसेविका सौ. मीनलताई विशाल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आधारयुक्त (NCMC) स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवार, २४ जून २०२६ ते मंगळवार, ३० जून २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सौ. मीनलताई विशाल यादव यांच्या जनसंपर्क कार्यालय, बालब्रह्मचारी सिदोजी आप्पा चौक (गाय-वासरू चौक), मोहन नगर, चिंचवड येथे होणार आहे. या शिबिरात नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि OTP आवश्यक असणार आहे. NCMC स्मार्ट कार्डासाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क १९९ रुपये असून, या कार्डामुळे प्रवाशांना विविध शासकीय सवलतींचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
विशेष म्हणजे, ७५ वर्षांवरील नागरिकांना १०० टक्के, तर ६५ वर्षांवरील नागरिक व महिला सन्मान योजनेतील लाभार्थींना ५० टक्के प्रवास सवलत मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन वेळेत स्मार्ट कार्ड काढण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे


