spot_img
spot_img
spot_img

बावधनमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह दोघे जेरबंद; 1.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत विनापरवाना दोन गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बावधन परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून 2026 रोजी मध्यरात्री चांदणी चौकाकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील नीरा विक्री केंद्राजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. या कारवाईत आर्यन प्रकाश जाधव (वय 20) व ओमकार सचिन मोरे (वय 30) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

त्या वेळी पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या कलम 37 अंतर्गत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!