spot_img
spot_img
spot_img

भरधाव क्रेनची पादचाऱ्याला धडक; 63 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, चालक अटकेत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरीतील बालाजीनगर चौकात भरधाव क्रेनच्या धडकेत 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजता दुर्गादास यल्लाप्पा चौगुले (वय 63) हे बालाजीनगर चौकात रस्ता ओलांडत असताना एमएच-14 जीवाय-4595 क्रमांकाची एस्कॉर्ट कंपनीची क्रेन भरधाव व निष्काळजीपणे चालवत असलेल्या चालक सरताज इरसाद अहमद (वय 35) याने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर चौगुले रस्त्यावर पडले असता क्रेनचे पुढील डावे चाक त्यांच्या कंबरेवर व उजव्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी 24 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!