spot_img
spot_img
spot_img

लिंक्डइनवरून संपर्क, मोठ्या नफ्याचे आमिष; बावधनमधील व्यक्तीची 36.25 लाखांची सायबर फसवणूक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

लिंक्डइनवरून संपर्क साधत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 36 लाख 25 हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील जिंदल याने LinkedIn व टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने 36.25 लाख रुपये गुंतवणूक करून घेतली. मात्र, गुंतवणुकीवरील नफा तर दिलाच नाही, शिवाय मूळ रक्कमही परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार 6 मे ते 4 जून 2026 या कालावधीत बावधन परिसरात घडला. याप्रकरणी 24 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विभुते करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!