spot_img
spot_img
spot_img

भक्तीशक्ती चौक अंडरपासमध्ये गांजासह युवक अटकेत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

निगडीतील भक्तीशक्ती चौक अंडरपास परिसरात गांजा बाळगणाऱ्या एका युवकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ४९.२७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास भक्तीशक्ती चौक अंडरपास परिसरात गस्तीदरम्यान एका युवकाची हालचाल संशयास्पद आढळली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ४९.२७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

या प्रकरणी संतोष नरेश वाल्मीकी (वय २७, रा. सेक्टर २२, निगडी) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे २ हजार ४५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी ठेवला होता, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!