spot_img
spot_img
spot_img

लाईट कनेक्शनच्या वादातून दगडाने जीवघेणा हल्ला; तरुण आयसीयूमध्ये

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

भोसरीतील सद्गुरूनगर परिसरात भाड्याच्या खोलीच्या वादातून दोन भावांवर दगड व काठीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल सुर्वे (वय २२) यांनी आरोपी अजय चव्हाण (२४) व विजय चव्हाण (२२) यांना खोली खाली करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी खोली खाली न केल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याच कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी विशाल सुर्वे व त्यांचा भाऊ आकाश सुर्वे यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. यावेळी विजय चव्हाण याने दगड उचलून आकाश सुर्वे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यानंतर अजय चव्हाण यानेही दुसरा दगड डोक्यावर फेकून मारल्याने आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जय हिंद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. विशाल सुर्वे यांनाही डोक्याला दुखापत झाली आहे.

या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मांजरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!