spot_img
spot_img
spot_img

भरधाव टाटा वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; उत्तर प्रदेशातील कामगाराचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

तळेगाव ते कोरेगाव फाटा मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका 41 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश लालचंद यादव (वय 41) हे 16 जून रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांच्या हिरो होंडा स्लेंडर दुचाकीवरून तळेगाव-कोरेगाव फाटा मार्गाने जात होते. त्यावेळी आरोपी कैलाश बसंतु यादव याने त्याच्या ताब्यातील टाटा वाहन (एमएच 14 जीडी 9522) भरधाव व निष्काळजीपणे चालवत दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात राजेश यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच शरीरावर अनेक ठिकाणी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी चालक कैलाश यादव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 281, 106(1), 125(अ), 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!