spot_img
spot_img
spot_img

कोमल वाईन्ससमोरील बॅरिकेट हटवा, अन्यथा आंदोलन – मारुती जाधव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शरदनगर, कोयनानगर, शिवाजी पार्क, फुलेनगर, जिजामाता पार्क व घरकुल परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्पाईन रोडलगत असलेला पर्यायी मार्ग प्रशासनाने लोखंडी बॅरिकेट लावून बंद केल्यामुळे हजारो नागरिकांना कृष्णानगर चौकातील कोमल वाईन्ससमोरून ये-जा करावी लागत आहे.

या मार्गावर महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. वाईन शॉप परिसरात मद्यपींचा वावर असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वी हा पर्यायी मार्ग खुला असल्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता येत होती. मात्र प्रशासनाने कोणत्याही जनसुनावणीशिवाय पुन्हा मार्ग बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि चिखली पोलीस स्टेशन यांना निवेदन देत बॅरिकेट तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे.

“नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा बॅरिकेट महत्त्वाचे का? महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी नेमके कोणत्या मार्गाने जावे याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. आठ दिवसांत रस्ता खुला न झाल्यास लोकशाही मार्गाने बॅरिकेट हटवा आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पर्यायी मार्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!